पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देहूत आगमन, तुकाराम महाराजांच्या मंदिराचे लोकार्पण संपन्न

13

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आले असून . जगतगुरू संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आणि शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते संपन्न झाले . पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूत दाखल झाले आहे. पंतप्रधान मोदी हे सभा मंडपातून वारकरी संप्रदायाला संबोधित करणार आहेत. सभास्थळी 30 – 40 हजार नागरिक बसतील, अशी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

जगतगुरू संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आणि शिळा मंदिराचे वैशिट्ये

जगदगुरु संत तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवल्यानंतर, तुकाराम महाराज 13 दिवस ज्या शिळेवर  उपोषणाला बसले होते, तीच शिळा भाविकांच्या दर्शनासाठी तपोवन महाराजांनी देहू मंदिरात आणून ठेवली होती.

संत तुकाराम महाराजांचं आयुष्यमान 42 वर्षाचं असल्यानं शिळा मंदिराची कळसापर्यंतची उंची 42 फुटांची आहे, तसेच शिळा मंदिरात अखंड काळ्या पाषाणाची संत तुकाराम महाराजांची 42 इंचाची सुबक मूर्ती आहे . ही मूर्ती 42 दिवसांमध्ये मूर्ती शिल्पकार चेतन हिंगे यांनी तयार केली आहे.

मंदिराची रचना ही हेमाडपंथी आहे. मूळ गर्भगृह 14×14 एवढ्या आकाराचे असून, अंतर गर्भगृह 9×9 उंची 17×12 एवढी आहे. 

मोठ्या उत्साहात पंतप्रधान मोदिंचे स्वागत करण्यात आले. तुळशीचा हार व तुकोबांची पगडी देवून मा. नरेंद्र मोदी यांचा सत्कार करण्यात आला. मा. नरेंद्र मोदी यांनी मराठीतून आपल्या भाषणाची सुरवात केली. तुकोबांची शिळा ही भक्ती आणि आधाराची केंद्र आहे. संत तुकाराम महाराजांचे अभंग हे अनेक पिढ्यांचे मार्गदर्शक आहेत. संतांच्या कार्यातून कायम सकारात्मक उर्जा मिळत राहते. संत हे कायम कोणत्याही परिस्थिती मध्ये समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी पुढे येत असतात, पालखी मार्गांचे काम हे तीन टप्प्यात करण्यात येणार आहे. ३५० किमी लांबीचा पालखी मार्ग असून त्यासाठी ११ हजार कोटींचा खर्च आहे. राज्यातील तसेच देशातील संतांचे कार्य त्यांचे योगदान याबद्दल त्यांनी सांगितले. असे मा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारकर्यांना संबोधित करताना सांगितल.

यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार, विरोधी पक्ष नेते मा. देवेंद्र फडणवीस हे मंचावर उपस्थित होते.