News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

मुंबई – प्रतिवर्षी दादर येथील शिवाजी पार्कवर भव्य पद्धतीने साजरा करण्यात येणारा शिवसेनेचा दसरा मेळावा यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मर्यादित कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे. २५ ऑक्टोबर या दिवशी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात ५० लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ७ वाजता संबोधित करणार आहेत.