हडपसर Hadapsar (जिल्हा पुणे) येथील उड्डाणपूल वाहतुकीस बंद केल्याने पर्यायी मार्गांवर वाहतूककोंडी !

8

पुणे – हडपसर Hadapsar (District Pune) गाडीतळ येथील उड्डाणपूल वाहतुकीस धोकादायक झाल्याने ५ फेब्रुवारीपासून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून पुलाच्या दुरुस्तीचे काम महापालिकेकडून तातडीने हाती घेण्यात आले आहे. या उड्डाणपुलावरून अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे पुलाच्या काही भागाला तडे गेल्याचे निदर्शनास आले आहे. दुरुस्तीमुळे वाहतुकीस पूल बंद करून या भागातील वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. त्यामुळे गाडीतळ भागात वाहतूककोंडी होत असून केलेल्या पालटामुळे वाहनचालकही गोंधळून गेल्याचे दिसून येत आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी या भागात अधिक वाहतूक पोलीस कर्मचारी नेमण्यात आल्याची माहिती हडपसर वाहतूक पोलिसांनी दिली आहे.