महाभारतातील ‘भीम’ अभिनेते प्रविण कुमार यांचे निधन

18

बीआर चोप्रा यांच्या महाभारत Mahabharat या मालिकेमध्ये ‘भिम’ ही भूमिका साकारणारे अभिनेता प्रवीण कुमार सोबती Pravin Kumar Sobti यांचे निधन झाले आहे. दिल्ली  येथे राहत्या घरी प्रवीण कुमार सोबती यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ते ७४ वर्षाचे होते. अनेक दिवसापासून ते आजारी होते. त्यांना पाठदुखीची समस्या होती. त्यांची कन्या निपुणिकाने दिलेल्या माहितीनुसार त्यांना सोमवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास ह्रदयविकाराचा झटका आला होता.

अभिनयापूर्वी प्रवीण हातोडा आणि डिस्कस थ्रोचा खेळाडू होते . आशियाई स्पर्धेत त्यांनी 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्यपदक जिंकले होते. आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत पदके जिंकून त्यांनी देशाचे नाव उंचावले होते. त्यांना अर्जुन पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते. क्रीडा जगतात नाव कमावल्यानंतर त्यांना बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (बीएसएफ) ची नोकरीही मिळाली, पण काही वर्षांनी प्रवीणकुमार सोबती यांनी अभिनय करण्याचा निर्णय घेतला आणि मागे वळून पाहिले नाही. प्रवीण कुमार यांनी 70 च्या दशकाच्या उत्तरार्धात मनोरंजनाच्या जगात प्रवेश केला. त्यांची पहिली भूमिका रविकांत नागाईच यांनी दिग्दर्शित केली होती ज्यात त्यांच्याकडे कोणतेही संवाद नव्हते.