तुमच्या बातम्या, लेख, विचार, सूचना इमेलवर पाठवा. Email – thalaknews@gmail.com
Home Agriculture मानवनिर्मित कीटकनाशके मानवाचे मित्र कि शत्रू ?

मानवनिर्मित कीटकनाशके मानवाचे मित्र कि शत्रू ?

15
तुमच्या बातम्या, लेख, विचार, सूचना इमेलवर पाठवा. Email – thalaknews@gmail.com

१. कीटकनाशकांमुळे शेतीला लाभ; मात्र काही उपयुक्त प्राण्यांंवर होणारा विपरीत परिणाम !

तुमच्या बातम्या, लेख, विचार, सूचना इमेलवर पाठवा. Email – thalaknews@gmail.com

‘शेती नष्ट करणारे कीटक, तसेच डासांदी उपद्रवी कीटकांची संख्या न्यून करण्यास विषारी रसायनयुक्त कीटकनाशकांनी साहाय्य केले; पण या विषारी रसायनांमुळे अनेक उपयुक्त आणि निरूपद्रवी प्राणी अन् कीटक यांच्या जीवनशैलीवर विपरीत परिणाम झाले.

२. ‘डी.डी.टी.’च्या स्वैर वापरामुळे सहस्रोे मैलांवरही त्याचे अंश सापडणे

‘डी.डी.टी.’ या कीटकनाशकाचा स्वैर वापर जसा चालू झाला, तसा अन्न, धान्य, पाणी, भूमी, इतकेच नव्हे, तर सहस्रोेे मैल दूर ‘अंटार्टिका’ खंडातील बर्फातसुद्धा डी.डी.टी.चे अंश सापडले !

३. ‘डी.डी.टी.’ आणि डी.डी.इ. या विषारी
घटकांच्या दुष्परिणामांचा अभ्यास होणे आवश्यक असणे

‘डी.डी.टी.’ आणि त्याचे विघटन होऊन निर्माण होणारा ‘डी.डी.इ.’ हे दोन्ही घटक अतीविषारी म्हणून आता सर्वमान्य झाले आहेत. त्या कीटकनाशकांचे दुष्परिणाम काय होऊ शकतात ? हे एका परिपूर्ण अभ्यासातून स्पष्ट करता येईल.

४. ससाण्यांवर झालेले दुष्परिणाम !

४ अ. निसर्गाची आवड असणार्‍या परकियांंनी ‘डी.डी.टी.’च्या वापरापूर्वी उपयुक्त अशा ससाण्यांचा अभ्यास करणे

इंग्लंड आणि युरोपमधील देशांना ‘निसर्ग इतिहास’ या विषयाची आवड असल्याने त्यांनी विविध कीटक, पक्षी, बेडूक आणि मासे यांच्या विषयीचा शेकडो वर्षांचा इतिहास नोंदवला असून त्यांचा अभ्यासही चालू असतो.

‘डी.डी.टी.’चा वापर चालू होण्यापूर्वी या देशांत मनुष्याला उपयुक्त असणार्‍या ससाण्यांच्या अनेक जातींचा अभ्यास चालू होता. हे ससाणे शेतातील धान्य आणि बिया खाणार्‍या छोट्या पक्ष्यांना मारून खातात. 

मानवनिर्मित कीटकनाशकेच प्रदूषणास कारणीभूत ठरणे

या संपूर्णपणे मानवनिर्मित रसायनयुक्त कीटकनाशकांचा अनेक काळ टिकून रहाण्याचा गुणधर्मच अशा प्रदूषणास कारणीभूत ठरला आहे

(संदर्भ : दैनिक सनातन प्रभात )

तुमच्या बातम्या, लेख, विचार, सूचना इमेलवर पाठवा. Email – thalaknews@gmail.com