शाळांमध्ये प्रार्थना, प्रतिज्ञा परिपाठ रोज होते. मुलांमध्ये चांगले संस्कार निर्माण व्हावेत, त्यांच्यात देशभक्ती निर्माण व्हावी, भारतीय संस्कृतीची माहिती व्हावी म्हणून नियमित राष्ट्रगीत, प्रार्थना, प्रतिज्ञा म्हणजेच परिपाठ होतो.
राज्य सरकारने त्यात आता आणखी एका गीताचा समावेश केला आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत आता शाळांमध्ये दररोज गायले जाणार आहे. यासंदर्भात शासनाने आदेश काढला आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ गीतास राज्यगीताचा दर्जा महाराष्ट्र राज्य सरकारने दिला. वर्षभरापूर्वी हे गीत राज्यगीत झाले. त्यानंतर या गीताला त्याचा उचित सन्मान मिळावा म्हणून नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी यंदाच्या मराठी भाषा गौरव दिनी २७ फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून शाळांमध्ये आपले राज्यगीत गायले जावे ही मागणी करण्यात आली. अमित ठाकरे यांच्या या पत्राचा सकारात्मक परिणाम म्हणून राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शासन आदेश काढला आहे.
त्यानुसार, सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या प्रत्येक शाळेत राष्ट्रगीत व प्रार्थनेसोबत राज्यगीत वाजवले -गायले जाईल याची दक्षता शाळा व्यवस्थापनांनी घ्यायची आहे. सुचनेचे पालन हॉट असल्याची दक्षता सर्व शिक्षण उप संचालक यांनी घ्याची आहे, अशी माहिती पत्रकात आहे.