News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

बेंगळुरू (कर्नाटक) – भारताने सूर्य मोहिमेच्या अंतर्गत प्रक्षेपित केलेल्या ‘आदित्य एल्-१’ (Aditya L1) यानाच्या निर्मितीमागील काही माहिती आता समोर येत आहे. शास्त्रज्ञांनी सांगितले की, ज्या ठिकाणी हे यान बनवण्यात येत होते, त्या ठिकाणी त्यांना अत्तर लावून जाण्यासह अनेक बंधने घालण्यात आली होती; कारण अत्यंत सूक्ष्म कणांचा परिणाम यानाच्या उपकरणांवर होण्याची शक्यता होती. या ठिकाणाची स्वच्छता रुग्णालयातील अतीदक्षता विभागापेक्षा १ लाख पटींनी अधिक ठेवावी लागते. येथे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणे शास्त्रज्ञांच्या सर्व श्रमावर पाणी ओतण्यासारखे असते.

शास्त्रज्ञांनी अत्तर वापरणेही केले होते बंद

येथील तंत्रज्ञान पथकाचे प्रमुख नागाबुशाना यांनी सांगितले की, या ठिकाणी काम करण्यासाठी विशेष प्रकारचा सुट (पेहराव) घालावा लागतो. यामुळे तेथे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण पोचू शकत नाही. पथकातील प्रत्येकाला या ठिकाणी येण्यापूर्वी ‘अल्ट्रासोनिक क्लिनिंग  प्रोसेस’ (सूक्ष्मस्तरावरील स्वच्छता प्रक्रिया) पूर्ण करून यावे लागत होते.