News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरी या काळात अनेक शिक्षक वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. अनेक शिक्षक पाड्यावर, वाड्या-वस्त्यांवर जाऊन विद्यार्थ्यांच्या घरी भेट देऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. स्वाध्याय पुस्तिका स्वत: तयार करुन विद्यार्थ्यांना देत आहेत. आठवड्याला गृह भेट देणे, दैनंदिन फोनच्या माध्यमातून विद्यार्थी संवाद, लाऊडस्पीकरच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षण असे अनेक उपक्रम राबवित आहेत. अशा सर्व शिक्षकांचे कार्य मोलाचे असल्याचे गौरवोद्गार शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली काढले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जयमहाराष्ट्र या कार्यक्रमात प्रा. गायकवाड बोलत होत्या. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन प्रसारित झालेली ही मुलाखत ज्येष्ठ पत्रकार श्री.राजेंद्र हुंजे यांनी घेतली.

प्रा. गायकवाड यांनी शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची यावेळी माहिती दिली. त्या म्हणाल्या, खऱ्या अर्थाने शिक्षकांमुळेच या काळामध्ये शिक्षण सुरु राहिले आहे. तसेच अशा शिक्षकांना एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी SCERT मार्फत ऑनलाईन शिक्षक विकास मंच हा कार्यक्रम सुरु करण्यात आलेला आहे. यामध्ये प्रत्येक जिल्हानिहाय उत्तम काम करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे.

संदर्भ – महासंवाद