कंपाला (युगांडा) – युगांडामध्ये Uganda समलैंगिक संबंध homosexuals ठेवणार्यांना जन्मठेप किंवा फाशी देणारा कायदा संमत करण्यात आला आहे. समलैंगिक संबंधांवर यापूर्वीच या देशात बंदी होती; मात्र आता ते ठेवणार्यांना कठोर शिक्षा करणारा हा कायदा संमत करण्यात आला आहे.
या कायद्याच्या विरोधात अमेरिकेने प्रतिक्रिया व्यक्त करतांना युगांडामधील अमेरिकेची गुंतवणूक अल्प करण्याची धमकी दिली आहे.