टूथपेस्ट वरील पट्ट्यांचा अर्थ काय ?

70

आपण दररोज दातांची स्वच्छता करण्यासाठी टूथपेस्टचा वापर करतो. त्यावर आपल्याला लाल, हिरव्या, काळ्या आणि निळ्या रंगाच्या पट्ट्या दिसतात. पण, या पट्ट्या नेमक्या कशासाठी असतात?

टूथपेस्टच्या ट्यूबवर असलेल्या वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्या मानवाच्या आरोग्याशी काहीही संबंध नाही. रंगीत पट्ट्या या ट्यूब उत्पादनाच्या प्रक्रियेचा एक भाग आहे. त्याचा आणि टूथपेस्टमधील रसायनांचा काहीही संबंध नसतो. रंगीत मार्कला ‘आय मार्क’ म्हणतात. ट्यूबला कुठे कापायचे आणि फोल्ड करायचे याची सूचना मशिनला देण्याचे काम हे मार्क करीत असतात. कोलगेट कंपनीच्या वेबसाईटवरसुद्धा कलर मार्क/कोड विषयक मेसेज खोटा असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे रंगावरून कोणती टूथपेस्ट आरोग्यासाठी चांगली हे सांगणारे व्हायरल मेसेज तुमच्याकडेही पोहोचले असतील तर त्याला बळी पडू नका. तुम्हाला वाटत असल्यास कुठलं टूथपेस्ट वापरायचं याबाबत तुमच्या डेंटिंस्टचा सल्ला घ्या

संदर्भ – dailyhunt