News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

नाशिक – सिन्नर तालुक्यातीलच जोगलटेंभी येथे बिबट्याने आक्रमण केल्यावर संगीता काळे या महिलेने पिशवीतील डब्याच्या साहाय्याने प्रतिकार करत त्याला पळवून लावले. संगीता या शेतातील काम उरकून घरी परतत होत्या, तेव्हा हा प्रकार घडला.

त्यांनी प्रसंगावधान राखत विळा, खुरपे आणि जेवणाचा डबा यांच्या साहाय्याने प्रतिकार करत बिबट्यापासून स्वत:ला वाचवले. यात त्यांचा हात आणि मान यांना दुखापत होऊन त्या घायाळ झाल्या. जेवणाच्या डब्याची कापडाची पिशवी त्यांनी फिरवली. ती बिबट्याच्या जबड्यात आली.

संगीता यांनी बिबट्याला ढकलत आरडाओरड केली. त्यानंतर बिबट्या पळून गेला. या प्रकारामुळे बिबट्यांविषयी ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे ‘परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा’, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे