पोलिसांच्या अहवालातील माहिती !

नाशिक –Nashik  येथून प्रतिदिन २ – ३ मुली बेपत्ता होत आहेत. जानेवारी ते ८ मे २०२३ या कालावधीत येथून ९५६ मुली आणि महिला बेपत्ता Girl Woman Missing असल्याची माहिती पोलीस आयुक्तालयाकडे आहे. नाशिक पोलिसांच्या प्रतिदिनच्या गुन्ह्याच्या संदर्भातील अहवालातून ही आकडेवारी समोर आली. ९५६ पैकी २२१ मुली अल्पवयीन आहेत, तर १८ वर्षांपुढील महिला ७३५ आहेत. पोलिसांना केवळ ३१ अल्पवयीन मुली सापडल्या आहेत. आहे. उर्वरितांचा शोध चालू आहे.

नोकरी, विवाह, कौटुंबिक कलह, सामाजिक प्रसारमाध्यमांचा अतीवापर, प्रियकराकडून लग्नाचे आमीष, विवाहबाह्य संबंध, प्रेमाचे आमीष दाखवून मुलींची केली जाणारी दिशाभूल ही कारणे या बेपत्ता होण्यामागे असावीत, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

‘द केरल स्टोरी’ चित्रपटाला विरोध करू पहाणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? या विषयाकडे आताच गांभीर्याने पहायला हवे, अन्यथा ‘द महाराष्ट्र स्टोरी’ काढायला वेळ लागणार नाही !