Water supply will be shut off in Nashik city for two days
Image by macrovector on Freepik

नाशिक – पावसाळ्यापूर्वीची कामे वीज वितरण कंपनीने सुरु केली आहे. यामुळे शनिवारी पाणीपुरवठा होणार नाही तर रविवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. एप्रिल महिन्यात एकीकडे अनेक शहरांवर पाणी कपातीचं संकट आले आहे. तर दुसरीकडे महावितरण कंपनीने पावसाळ्यापूर्वीची कामे सुरु केली आहे. यामुळे वीज पुरवठा बंद असणार आहे. त्याचा परिणाम शनिवारी (२९ एप्रिल २०२३) संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा (Nashikcity Water Supply) बंद राहणार आहे. महावितरणकडून होणाऱ्या शट डाऊनमुळे शनिवारी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय नाशिक महापालिकेने घेतला आहे. या दरम्यान नागरिकांना पाण्याचा जपूर वापर करावा, असे आवाहन मनपाने केले आहे.

शनिवारी वीज उपकेंद्र आणि मुख्य वीज वाहिन्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. यामुळे नाशिक महानगरपालिकेच्या गंगापूर आणि मुकणे धरणातील उपसा केंद्रांचा वीज पुरवठा बंद असणार आहे. शनिवारी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच रविवारी सकाळी कमी दाबाने, कमी प्रमाणात पाणी पुरवठा होणार आहे, असे महानगरापालिकेने स्पष्ट केले आहे.