पुढील 5 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

पुढील 5 दिवस राज्याच्या विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भाच्या काही भागात तसेच मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सातारा, सिंधुदूर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
“X इज लाइव्ह”: इलॉन मस्कने नवीन लोगोसह ट्विटर मुख्यालयाचा फोटो पोस्ट केला

ट्विटरचे बॉस एलोन मस्क यांनी सोमवारी कंपनीच्या मुख्यालयाचा नवीन लोगो – X मध्ये सुशोभित केलेला फोटो पोस्ट केला. सोशल मीडिया कंपनी लवकरच आपला लोगो बदलणार असल्याची घोषणा त्यांनी ट्विटमध्ये केल्यानंतर लगेचच अनावरण झाले.
ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाला सुप्रीम कोर्टा कडून स्थगिती

वाराणसी जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापीतील वजू खाना (नमाजापूर्वी हात आणि पाय धुण्याची जागा) वगळून सर्व परिसराचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याच्या दिलेल्या आदेशाला स्थगिती देण्यासाठी मुसलमान पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. आदेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली.
ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं निधन

जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं निधन झाले. ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांनी वयाच्या 88व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र आज त्यांचे निधन झाले.
नुकसानग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांना तातडीने 10 हजारांची मदत- अजित पवार

राज्यात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं आणि नागरिकांचं नुकसान झाले आहे आहे त्यांच्या पाठीशी राज्य सरकार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने 10 हजारांची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेमध्ये केली.
नाशिक जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा कायम

राज्याच्या मुबंई, कोकण, पुणे व इतर भागात जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू असून. मात्र नाशिक जिल्ह्याचा काही भाग कोरडाच असून शेतकरी तसेच सर्व सामान्य नागरिकांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.
मणिपूरवर चर्चेसाठी सरकार तयार आहे, असे अमित शहा लोकसभेत म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी सांगितले की सरकार मणिपूरवर चर्चेसाठी तयार आहे आणि विरोधकांना या विषयावर चर्चा होऊ द्यावी अशी विनंती केली. “मी सभागृहात मणिपूरवर चर्चेसाठी तयार आहे. मी विरोधकांना विनंती करतो की या मुद्द्यावर चर्चा होऊ द्यावी. या संवेदनशील प्रकरणातील सत्य देशाला कळणे महत्त्वाचे आहे, असे ते लोकसभेत म्हणाले.