फिजीच्या पंतप्रधान सिटिव्हनी राबुका यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फिजीचा सर्वोच्च सन्मान देऊन सन्मानित केले. फिजीचा सर्वोच्च सन्मान “कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी” (Companion of the Order of Fiji) हा पंतप्रधान मोदींना त्यांच्या जागतिक नेतृत्वाची दखल घेऊन प्रदान करण्यात आला. आजपर्यंत हा मान फिजी नसलेल्या मोजक्याच लोकांना मिळाल्याचे सांगितले जाते.