News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

पुणे – पिंपरी-चिंचवड येथे होणार्‍या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी २० लाख रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. हा निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल, असेही ते म्हणाले.

नाट्य संमेलनासाठी मंडप उत्तम दर्जाचा असावा, नाट्य कलावंतांना आवश्यक सर्व सुविधा महानगरपालिकेने उपलब्ध करून द्याव्यात, असे पवार यांनी सांगितले. कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून संमेलनाला सहकार्य करण्यात येईल, असे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले, तर भाऊसाहेब भोईर यांनी नाट्यसंमेलनाची माहिती दिली.