रायगड | प्रतिनिधी – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज, १२ एप्रिल रोजी रायगड दौऱ्यावर असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. त्यांच्या संपूर्ण महाराष्ट्र दौऱ्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:
- सकाळी १०.३० वाजता – पाचाड येथे राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे दर्शन
- सकाळी ११.०० वाजता – रायगड किल्ल्याचे दर्शन व भ्रमण
- सकाळी ११.३० वाजता – रायगडावर विविध कार्यक्रमांना उपस्थिती
- दुपारी १२.३० वाजता – छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण
- दुपारी १२.४५ वाजता – समाधीस्थळी आयोजित कार्यक्रमाला हजेरी
- दुपारी २.१५ ते ३.०० – पुण्यातील एका कार्यक्रमात सहभाग
- दुपारी ३.३० वाजता – मुंबईकडे प्रयाण
- सायंकाळी ५.३० वाजता – ‘चित्रलेखा’ गुजराती साप्ताहिकाच्या ७५ व्या वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थिती
- सायंकाळी ६.२० वाजता – सह्याद्री अतिथीगृहात उपस्थिती
अशा प्रकारे अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौर्याचे नियोजन करण्यात आले आहे.