differences-between-evms-in-usa-and-india
US and IND EVM

नाशिक – नाशिक लोकसभा मतदार संघात काल अंदाजे ६१ टक्के मतदान झाले. मागील पंचवार्षिकपेक्षा यंदा मतदान तीन टक्क्यांनी वाढले आहे. तर दिंडोरीतही ६२.६६ टक्के मतदान झाले. नाशिक मतदार संघात काल सकाळी सातपासून मतदानाला प्रारंभ झाला. नाशिकमध्ये काही भागात मतदान यंत्रे बंद पडल्याने वेळेचा अपव्यय झाला तर शांतिगिरी महाराज यांनी त्र्यंबकेश्वर येथे ईव्हीएमला पुष्पहार अर्पण केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी सात ते पाच पर्यंत ५१. टक्के तर दिंडोरी मतदारसंघासाठी ५७ टक्के मतदान झाले. नाशिक मध्ये दरम्यान दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य इव्हीएममध्ये बंद झाले असून येत्या चार जूनला मतमोजणी होणार असून जनतेचा कौल कोणाला याचा फैसला होणार आहे. ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे, महायुती शिंदे गटाचे हेमंत गोडसे, अपक्ष मैदानात उतरलेले शांतिगिरी महाराज, वंचितचे करण गायकर यांसह तब्बल ३१ उमेदवार रिंगणात होते. लोकसभेत दिंडोरी महायुतीतील भाजपच्या विद्यमान आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, महाविकास आघाडी शरदचंद्र पवार गटाचे भास्कर भगरे यांसह दहा उमेदवार नशिब आजमवत होते. किरकोळ अपवाद वगळता सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.