News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

नाशिक –
नाशिकमध्ये आयटी पार्कचा प्रश्न अनिश्चित असतानाच, शहराच्या आयटी क्षेत्राला महत्त्वाची गती मिळण्याची चिन्हं दिसत आहेत. फ्रेंच आयटी कंपनी Capgemini ने भारतातील नामवंत WNS Global Services या बीपीओ व आयटी सेवा कंपनीचे सुमारे ₹28,000 कोटींना अधिग्रहण केल्याची अधिकृत घोषणा केली आहे.

ही व्यवहार कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व Agentic AI — म्हणजेच निर्णयक्षम एआय — क्षेत्रात जागतिक आघाडी गाठण्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. या अधिग्रहणामुळे नाशिकमधील WNS चे दोन कार्यरत केंद्रे (शरणपूर रोड व वडाळा परिसर) यांचे आधुनिकीकरण होणार असून, रोजगार संधी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

WNS ही नाशिकमधील सर्वात मोठी बीपीओ-आयटी कंपनी आहे. सध्या येथे सुमारे साडेतीन हजार कर्मचारी कार्यरत असून, कंपनी हेल्थकेअर, लॉजिस्टिक, ट्रॅव्हल, हायटेक सर्व्हिसेस आणि शिपिंग क्षेत्रात सेवा देते.

सन 1990 मध्ये स्थापन झालेली ही कंपनी महाराष्ट्रात मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि नाशिक येथे कार्यरत आहे. WNS च्या ग्राहकांमध्ये कोकाकोला, युनायटेड एअरलाइन्ससारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सचा समावेश आहे.

आता थेट WNS चे अधिग्रहण झाल्याने, नाशिकमधील या दोन केंद्रांना थेट बळ मिळणार आहे.