प्योंगयांग (उत्तर कोरिया) – उत्तर कोरियामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ख्रिस्ती धर्मावर बंदी आहे. त्यामुळे येथे नाताळ साजरा केला जात नाही. असे असतांना अमेरिकेतील काही लोकांनी काही भेटवस्तू पिवळ्या समुद्रात फेकल्या आहेत. त्यांना आशा आहे की, या भेटवस्तू लवकरच उत्तर कोरियाच्या किनारपट्टीच्या शहरांपर्यंत पोचतील. या वस्तूंमध्ये काही बाटल्या असून त्यात बायबलची पाने आहेत. तसेच काही बाटल्यांमध्ये खाद्यपदार्थही आहेत. अमेरिकेतील नॉर्थ कोरियन फ्रीडम कोलिशन ग्रुपकडून हा प्रयत्न करण्यात आला आहे.
का आहे ख्रिस्ती धर्मावर बंदी ?
किम इल सुंग वर्ष १९४८ मध्ये सत्तेवर आले. उत्तर कोरियाच्या लोकांनी त्यांना देव मानावे, अशी त्यांची इच्छा होती. बरेच ख्रिस्ती याच्या विरोधात होते; म्हणून किम इल सुंग यांनी ख्रिस्त्यांना मारण्यास चालू केले. अनेक ख्रिस्त्यांना कारागृहात टाकण्यात आले. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणार्या लोकांचा त्यांना नाश करायचा होता. तेव्हापासून देशात ख्रिस्ती धर्मावर आणि नाताळवर बंदी आली.