राज्यातील चित्रपटगृहं, नाट्यगृहं आणि मल्टिप्लेक्स ५० टक्के क्षमतेसह ५ नोव्हेंबर पासून सुरु होणार आहेत. करोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर असलेल्या सगळ्या थिएटर्सना, नाट्यगृहांना आणि मल्टिप्लेक्सना ही संमती देण्यात आली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. करोना प्रतिबंधित क्षेत्रं अर्थात कंटेन्मेंट झोन वगळता तरण तलावही उघडण्यास संमती देण्यात आली आहे.
राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मार्च महिन्याच्या मध्यापासून करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून थिएटर्स, नाट्यगृहं, शाळा सगळं बंद करण्यात आलं होतं. आता अनलॉकच्या पार्श्वभूमीवर हळूहळू अनेक आस्थापनांना संमती देण्यात येत आहे.
Maharashtra Government allows cinema halls, theatres, multiplexes to open with 50% of their seating capacity in areas outside containment zones from 5th November.
— ANI (@ANI) November 4, 2020