पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Maharashtra SSC Result 2023) शुक्रवार, 2 जून 2023 रोजी इयत्ता 10वीचा म्हणजेच महाराष्ट्र SSC चा निकाल जाहीर केला. महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल आज 2 जूनला जाहीर झाला. या बोर्डाच्या परीक्षेत 93.83 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 95.87% मुली आणि 92.05% मुले आहेत.
महाराष्ट्र मंडळातर्फे 2 मार्च ते 25 मार्च दरम्यान इयत्ता 10वी बोर्डाची परीक्षा घेण्यात आली. राज्यातील 5033 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या परीक्षेसाठी एकूण 15,77,256 उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 3,54,493 एकट्या मुंबई विभागातील होते. महाराष्ट्रात 8,44,116 मुले आणि 7,33,067 मुलींनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. 15 लाख मुलांनी दिली परीक्षा.