राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या, ५ मे २०२५ रोजी जाहीर होणार आहे. शिक्षण मंडळाने यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध केली असून सोमवारी दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येणार आहे.
निकाल मंडळाच्या अधिकृत पत्रकार परिषदेत जाहीर केला जाईल. त्यानंतर विद्यार्थी खालील संकेतस्थळांवर जाऊन आपली गुणपत्रिका पाहू व डाऊनलोड करू शकतील:
mahresult.nic.in
mahahsscboard.in
hscresult.mkcl.org
msbshse.co.in
mh-ssc.ac.in
sscboardpune.in
sscresult.mkcl.org
hsc.mahresults.org.in
निकाल कसा पाहावा:
1. अधिकृत वेबसाइटवर जा
2. ‘महाराष्ट्र HSC निकाल 2025’ लिंकवर क्लिक करा
3. आपला सीट नंबर व आईचे नाव टाका
4. ‘Submit’ बटणावर क्लिक करा
5. स्क्रीनवर निकाल दिसेल – तो डाऊनलोड करा