News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

राज्यात विविध जिल्ह्यातील तलाठींची एकूण 4625 रिक्त पदे भरली जाणार आहेत. महाराष्ट्र शासनाकडून या भरतीसाठी 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2023 दरम्यान परीक्षा घेण्यात येणार. मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण पूर्ण झालेले उमेदवार तलाठी भरतीसाठी अर्ज करु शकतात. भूमी अभिलेख विभागाकडून तलाठी भरती परीक्षा घेण्यात येणार असून, त्याची लिंक लवकरच येणार आहे.

महाराष्ट्रातील सहा विभागाअंतर्गत येणाऱ्या ३६ जिल्ह्यांतील ४६४४ पदांच्या भरती केली जाणार आहे. यामध्ये पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोकण, तसेच अमरावती या विभागांचा समावेश आहे. राज्यातील सर्व जिल्हातून परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी एकच प्रश्नपत्रिका असणार आहे. तलाठी भरती परीक्षा TCS च्या माध्यमातून घेणार आहे.