संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजनांच्‍या अर्थसाहाय्‍यात वाढ !

15

मुंबई – संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्‍य निवृत्तीवेतन योजना Shravanbal Service Pension Schemes यांच्‍या अर्थसाहाय्‍यात प्रतीमास ५०० रुपये इतकी वाढ करण्‍याचा निर्णय राज्‍यशासनाने २८ जून या दिवशी मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत घेतला. या दोन्‍ही योजनांत सध्‍या १ सहस्र रुपये इतके मासिक अर्थसाहाय्‍य केले जाते.

यामध्‍ये संजय गांधी निराधार योजनेची रक्‍कम १ सहस्र ४०० रुपये, तर श्रावणबाळ सेवा राज्‍य निवृत्ती वेतनाची रक्‍कम १ सहस्र ३०० रुपये इतकी करण्‍यात आली आहे.  या दोन्‍ही योजना मिळून राज्‍यात ४० लाख ९९ सहस्र २४० लाभार्थी आहेत. निवृत्तीवेतनात वाढ करण्‍यात आल्‍यामुळे राज्‍यशासनाला २ सहस्र ४०० कोटी रुपये इतकी अतिरिक्‍त तरतूद करावी लागणार आहे.