शनिवार, १० मे २०२५ रोजी भारत सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भविष्यात भारताविरुद्ध होणारे कोणतेही दहशतवादी हल्ले ‘युद्धाची कृती’ म्हणून मानले जातील आणि त्याला तशाच कठोर पद्धतीने प्रत्युत्तर दिले जाईल.

पाकिस्तानकडून सातत्याने करण्यात येणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पाकिस्तानकडून होणाऱ्या कारवायांबद्दल माहिती दिली.

पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, सीडीएस आणि तिन्ही सशस्त्र दलांचे प्रमुख उपस्थित होते.

या निर्णयामुळे भारताच्या दहशतवादविरोधी धोरणात मोठा बदल होणार असून, भविष्यातील कोणत्याही दहशतवादी कारवायांना कठोर प्रत्युत्तर देण्यात येईल.