आज, 9 मार्च 2025 रोजी, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरारक अंतिम सामना रंगणार आहे. 37 वर्षांनंतर ही प्रतिष्ठित ट्रॉफी जिंकण्याच्या निर्धाराने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.

रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुभमन गिलची तुफानी फलंदाजी, तसेच वेगवान आणि स्पिन गोलंदाजी भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावेल. दुसरीकडे, न्यूझीलंड संघ देखील आपली सर्व ताकद पणाला लावणार आहे.

कोण मारेल बाजी? कोण उंचावेल चॅम्पियन्स ट्रॉफी? संपूर्ण जगाच्या क्रिकेट चाहत्यांचे डोळे या सामन्यावर खिळले आहेत!

सामना दुपारी २.३० वाजता jiohotstar आणि स्टार नेटवर्क वर बघायला मिळेल.