नाशिक – के. के. वाघ पॉलिटेक्निकच्या तृतीय वर्ष इलेक्ट्रिकल शाखेतील विद्यार्थ्यांनी ‘सोलर-पॉवर्ड एअरोपोनिक सिस्टम्स विथ अॅडव्हान्स्ड ऑटोमेशन’ या विषयावर संशोधन करत राष्ट्रीय स्तरावरील पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवले आहे.

विद्यार्थी प्रेम मोरे, प्रणव मगर, संगम लिहिनार आणि प्रगती घोडके यांनी आपल्या अभिनव संशोधन प्रकल्पाद्वारे शेती क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शाश्वत उत्पादन वाढीवर भर दिला आहे. संजिवनी के. बी. पी. पॉलिटेक्निक, कोपरगाव येथे १८ मार्च २०२५ रोजी झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. त्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि रोख ₹७,०००/- चे बक्षीस मिळाले.
त्याचप्रमाणे, २२ मार्च २०२५ रोजी के. के. वाघ पॉलिटेक्निकमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत त्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला, जिथे त्यांना प्रमाणपत्र आणि ₹४,०००/- रोख बक्षीस देण्यात आले.
या उल्लेखनीय यशामुळे के. के. वाघ पॉलिटेक्निकच्या नावात आणखी एक मानाचा तुरा रोवला असून, या विद्यार्थ्यांनी शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाच्या संधी अधोरेखित केल्या आहेत. त्यांचे हे यश महाविद्यालयासाठी तसेच शेतीच्या क्षेत्रात नावीन्य शोधणाऱ्या संशोधकांसाठी प्रेरणादायी आहे.

के के वाघ पॉलिटेक्निकचे प्राचार्य श्री. कडवे सर व इलेक्ट्रिकल शाखेतील विभाग प्रमुख व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.