apaleshwar Mandir Nashik
apaleshwar Mandir Nashik

नाशिक – पंचवटीतील जगप्रसिद्ध श्री कपालेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त जय्यत तयारी केली आहे. ८ मार्चला पहाटे ४ वाजेपासून मंदिर दर्शनासाठी खुले असणार आहे. २४ तास दर्शन घेण्याची सोय करण्यात आली आहे. महाशिवरात्रीनिमित्त कपालेश्वर मंदिरात दरवर्षी हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. भाविकांना दर्शनासाठी कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी मंदिर परिसरात सर्व काळजी घेतली जाणार आहे व बॅरिकेड्स लावण्यात येणार असून, खासगी सुरक्षारक्षकांसह पोलीस बंदोबस्तही असणार आहे. कपालेश्वर मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने या वर्षी महाशिवरात्रीला ५१ हजार रुद्राक्षांचे वाटप केले जाणार आहे. Kapaleshwar Mandir Nashik

पहाटे ते दुपारी १२ वाजेपर्यंत दुग्धाभिषेक करण्यात येणार असून, मंदिरात होणारी गर्दी तसेच ज्येष्ठ, दिव्यांग भाविकांना पायऱ्या चढण्यासाठी होणारी अडचण लक्षात घेऊन श्री कपालेश्वर महादेव मंदिरच्या वतीने टीव्ही स्क्रीनद्वारे भाविकांना लाइव्ह दर्शनाची कायमस्वरूपी सोय उपलब्ध करण्यात आली आहे. महाशिवरात्रीला दुपारी ३.३० वाजता पालखी मिरवणूक काढण्यात येईल. नाशिक पंचवटी व परिसरातील सर्व महादेव मंदिरांना महाशिवरात्री निमित्ताने विद्युत रोषणाई करण्यात आली असून, विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. श्री सिद्ध कलेश्वर महादेव मंदिरात विविध कार्यक्रम म्हसरूळ, दिंडोरी रोड येथील श्री सिद्ध कलेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रम करण्यात येणार आहे.