पुणे – लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पणतू, ‘केसरी’ या ऐतिहासिक वृत्तपत्राचे विश्वस्त संपादक आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक यांचे आज (मंगळवार) पहाटे पुण्यात निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७२ वर्षे होते.
डॉ. टिळक यांनी आपल्या कार्यकाळात शैक्षणिक, पत्रकारितेतील आणि सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्यांनी ‘केसरी’ या वृत्तपत्राच्या संपादनाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या विकासासाठी अनेक योजना राबवल्या.
त्यांच्या निधनानंतर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. त्यांच्या निधनामुळे टिळक कुटुंबीयांमध्ये आणि शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रात शोकाची लाट पसरली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. टिळक यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. आपल्या संदेशात त्यांनी डॉ. टिळक यांचे योगदान गौरवले आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या.