News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

लोकसभा निवडणूक २०२४ ची मतदान प्रक्रिया सात टप्प्यात पूर्ण झाली. त्यामुळे आता उद्या मंगळवारी ४ जून २०२४ रोजी निवडणूक निकाल येणार आहेत. संपूर्ण देशात सर्व लोकसभा मतदार संघांमध्ये निवडणुक मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. महाराष्ट्रातील ४८ मतदार संघातही उद्या मतमोजणी होणार आहे.

Exit polls मध्ये पुन्हा मोदी सरकार येणार असल्याचा अंदाज आला आहे. त्यामुळे उद्या निवडणूक निकाल Exit polls सारखे येतात की दुसरे काही याकडे संपूर्ण भारताचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत मुख्य लढत भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी यामध्ये आहे.

उद्या सकाळी ८ वाजेपासून सर्वच न्यूज चॅनल्सवर निकालांचे अपडेट्स मिळण्यास सुरवात होईल.