मुंबई | ३१ जुलै २०२५ –
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आज विशेष एनआयए न्यायालयाने (NIA Court) मोठा निकाल दिला आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, कर्नल श्रीकांत पुरोहित यांच्यासह सर्व सात आरोपींना निर्दोष घोषित करण्यात आलं आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणाला निर्णायक वळण मिळालं आहे.
२००८ मधील घटना:
सप्टेंबर २००८ रोजी मालेगाव शहरात दुचाकीवर ठेवलेला स्फोटकांचा साठा स्फोटात उडाला होता. या भीषण स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला आणि १०० हून अधिक लोक जखमी झाले होते. त्यानंतर सुरू झालेल्या तपासात साध्वी प्रज्ञा आणि इतरांविरोधात गंभीर आरोप झाले.
आजचा निर्णय:
एनआयए कोर्टाने सादर झालेल्या पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर सर्व आरोपींविरोधातील आरोप अपुरे पुरावे व साक्षी असल्यामुळे फेटाळून लावले. त्यामुळे सर्व सात आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.
प्रतिक्रिया:
या निर्णयावर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. साध्वी प्रज्ञा ठाकरेंनी कोर्टाबाहेर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “सत्याचा विजय झाला आहे. मी देवाचे आणि न्यायालयाचे आभार मानते.”
सुमारे १७ वर्षांनंतर या प्रकरणाला न्यायालयीन निर्णय मिळाला आहे.








