News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

मुंबईः मुंबईत करोना संसर्गाचा प्रादूर्भाव झपाट्याने खाली येत असून, रुग्ण दुप्पट वाढ कालावधी २५० दिवसांवर पोहोचला आहे. आता मुंबईत दिवाळीनिमित्त उसळलेली गर्दी लक्षात घेता पुन्हा रुग्ण संख्या वाढू नये म्हणून मुंबई पालिका प्रयत्न करत आहे.

मुंबईत ऑक्टोबरपासून करोना संसर्ग कमी होत असून, रुग्ण दुप्पट कालावधीत चांगलीच वाढ झाली आहे. मुंबई पालिकेच्या नोंदीनुसार या रुग्णवाढीचा सरासरी दरही कमी होत चालला असून आता ०. २७ टक्के पर्यंत खाली आला आहे. यापूर्वी ५ नोव्हेंबर रोजी मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीने २०० दिवसांचा (२०८) दिवसांचा टप्पा ओलांडला होता. त्यावेळी रुग्ण वाढीचा सरासरी दर ०. ३३ होता. मुंबईत ऑगस्टनंतर करोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने चिंतेचे ढग जमा झाले होते. मात्र, पालिकेने प्रयत्नांची शिकस्त करत हा आकडा कमी स्तरावर आणला आहे.

दरम्यान, एकूण २४ विभागांपैकी तब्बल २१ विभागात रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २०० दिवसांपेक्षा जास्त आहे. यापैकी, ४ विभागात ४०० पेक्षा अधिक तर, ५ विभागात ३०० पेक्षा अधिक तर, १२ विभागात २०० पेक्षा अधिक दिवसांचा रुग्ण दुपट्टीचा कालावधी गाठलेला आहे.

संदर्भ व अधिक माहिती – महाराष्ट्र टाईम्स