News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

रासायनिक खतांच्या वापराला फारसे उत्सुक नसलेल्या शेतकऱ्यांसाठी नॅनो युरिया nano urea हा सर्वोत्तम पर्याय असल्याचं, केंद्रीय खतं आणि रसायन मंत्री मनसुख मांडविय यांनी म्हटलं आहे. मुंबईत चेंबूर इथं नॅनो युरिया उत्पादन केंद्राची काल मांडविय यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पाची उत्पादन क्षमता प्रतिदिन दीड लाख बाटल्या नॅनो युरिया एवढी आहे, पुढच्या वर्षभरात या केंद्रातून नॅनो युरियाचं उत्पादन सुरू होईल, अशी आशा मांडवीय यांनी वर्तवली.