News Update thalaknews.com
News Update thalaknews.com
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळा

रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) 350 वा राज्याभिषेक सोहळा सुरू झाला आहे. ६ जूनपर्यंत हा सोहळा रंगणार आहे.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक राजकीय नेते उपस्थित आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने राज्य शासनाच्या माध्यमातून रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले. नरेंद्र मोदी म्हणाले की, मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक आहे. . महाराष्ट्रात हा दिवस एखाद्या सणासारखा साजरा केला जातो. राष्ट्रकल्याण आणि लोककल्याण हे राज्यकारभाराचे मूळ तत्व होते. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा एक अद्भुत अध्याय आहे. स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या प्रांगणात आज एका सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मी महाराष्ट्र सरकारलाही शुभेच्छा देतो. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.