सुदानमधून १ सहस्र १०० भारतियांची झाली सुटका !

6

खार्टुम (सुदान) – येथे चालू असलेल्या गृहयुद्धाच्या पार्श्‍वभूमीवर भारत सरकारने तेथे असलेल्या भारतियांना भारतात आणण्यासाठी ‘ऑपरेशन कावेरी’ प्रारंभ केले आहे. या अंतर्गत ३६० नागरिकांची पहिली तुकडी भारतात परतली आहे. त्यांना सुदानमधून नौकेद्वारे सौदी अरेबियातील जेद्दा येथे आणण्यात आल्यानंतर तेथून विमानाद्वारे नवी देहली येथे आणण्यात आले. यांतील एका मुलीने सांगितले की, आम्ही सुदानमध्ये कोणत्याही क्षणी मारले गेलो असतो.

आतापर्यंत १ सहस्र १०० भारतियांना सुदानमधून सौदी अरेबियात आणण्यात आले आहे. त्यांपैकी ३६० जणांना भारतात आणण्यात आले आहे, तर उर्वरितांना आणण्यात येण्याची प्रक्रिया चालू आहे. सुदानमध्ये ४ सहस्रांपेक्षा अधिक भारतीय आहेत.