CBS to Canada Corner Road Close by work
CBS to Canada Corner Road Close by work

नाशिक – जुना सीबीएस ते कॅनडा कॉर्नर रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे कामासाठी (दि. ८ एप्रिल ते ८ नोव्हेंबर २०२५) अठरा महिन्यांसाठी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्याचा अध्यादेश पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी जारी केला आहे. 

पुढील  मार्गांवर प्रवेश बंद: कॅनडा कॉर्नर सिग्नल, शरणपूररोड – सीबीएस सिग्नलकडे, राजीव गांधी भवन, टिळकवाडी सिग्नलमार्गे जाणारी वाहतूक , सिव्हिल हॉस्पिटल, ठक्कर बाजारकडून किशोर सुधारालय, मेळा बसस्थानकमार्गे सीबीएसकडे येणारी वाहतूक , जलतरण तलाव सिग्नलकडून रामायण बंगला, सीबीएसकडे येणारी, राका कॉलनी गार्डनकडून सीबीएसकडे येणारी, कुलकर्णी गार्डन, सीबीएसकडे येणारी, ठक्कर बाजाराकडून कुलकर्णी गार्डनकडे येणारी, नवीन पंडित कॉलनीकडून, राका गार्डन, सीबीएसकडे येणारी, जुनी पंडित कॉलनीकडून लेन नंबर १, २, ३, टिळकवाडी सिग्नलमार्गे सीबीएसकडील सर्व प्रकारची वाहतूक बंद केली आहे. 

पर्यायी मार्गः कॅनडा कॉर्नरकडून शरणपूररोडने सीबीएस सिग्नलकडे जाणारी वाहतूक कॅनडा कॉर्नर, जुना गंगापूरनाका, मॅरेथॉन चौक, अशोकस्तंभमार्गे किंवा कॅनडा कॉर्नर ते शरणपूर सिग्नल, मायको सर्कल, भवानी चौक, जलतरण तलाव सिग्नल, मोडक सिग्नल, त्र्यंबकनाकामार्गे इतरत्र जाईल.  

सीबीएस सिग्नल ते कॅनडा कॉर्नर सिग्नल या रस्त्याचे कामाचे टप्प्याचे ठिकाणी दोन्ही बाजूस १०० मिटरपर्यंत नमूद मार्गावर १८ महिन्यांकरीता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नो पार्किंग झोन करण्यात येत आहे. वरील सर्व प्रकारचे निर्बंध हे पोलीस वाहने, रूग्णवाहिका, शववाहिका, अग्निशामक दलाची वाहने, अत्यावश्यक व आपत्कालीन सेवेची वाहने यांना लागू राहणार नाही.