News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

‘ईस्ट इंडिया कंपनी’ आणि ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या नावांचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘इंडिया नावाचा वापर करून लोकांची दिशाभूल करता येणार नाही’, असे विधान केले. भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते. विरोधी पक्षांनी जनतेची दिशाभूल करण्यासाठी त्यांच्या आघाडीचे ‘इंडिया’ हे नाव ठेवले असून विरोधी पक्ष स्वतःही दिशाहीन आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, आज जगामध्ये भारताची प्रतिमा सुधारली आहे. वर्ष २०४७ पर्यंत आपण देशाला विकसित देश बनवू. देशवासियांना आपल्याकडून फार आशा आहेत. जनतेच्या पाठिंब्याने भाजप वर्ष २०२४ मधील लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा सत्तेवर येईल.