SSC Board Maharashtra Result
SSC Board Maharashtra Result

राज्यात दहावीचा आजचा एकूण निकाल ९५.८१ टक्के इतका लागला असून त्यात इयत्ता 12 वीच्या निकलप्रमाणे पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज दुपारी एक वाजता ऑनलाइन निकाल जाहीर केला. विभाग निहाय निकालात कोकण विभागानं ९९.०१ % घेत बाजी मारली आहे. तर नागपूर विभागाचा सर्वात कमी ९४.७३ % आहे. मुलींचा निकाल ९७.२१ % तर मुलांचा निकाल ९४.५६ % लागला आहे.

एकूण १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. निकालात मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे. ९४.५६ टक्के मुले उत्तीर्ण झाली असून, ९७ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. गेल्यावर्षी ९३.८३ टक्के निकाल लागला होता. गेल्यावर्षी राज्यातील १०८ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले होते.

विभागनिहाय निकाल – मुंबई- ९५.८३%, कोल्हापूर – ९७.४५% , पुणे – ९६.४४% , नागपूर – ९४.७३%, छत्रपती संभाजीनगर – ९५.१९%,लातूर – ९५.२७ % ,कोकण – ९९.०१ % , अमरावती – ९५.५८%, नाशिक- ९५.२८%, आहे.