News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

ओटावा (कॅनडा) – खलिस्तानी आतंकवादी हरदीपसिंह निज्जर याची कॅनडातील ब्रिटीश कोलंबिया राज्यातील सरे शहरात हत्या झाल्यानंतर पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप करत त्याविषयी पुरावे असल्याचाही दावा केला आहे; मात्र त्यांनी कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत.

याविषयी आता ब्रिटीश कोलंबिया राज्याचे राज्यपाल डेव्हिड एबी यांनी ट्रुडो यांना उघडे पाडले आहे. ते म्हणाले की, निज्जर याच्या हत्येविषयी आपल्याला जे काही ठाऊक आहे, ते सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध आहे. हे खूप निराशाजनक आहे. ट्रुडो यांनी कॅनडाच्या गुप्तचर यंत्रणेकडून माहिती घेतली होती; मात्र ती इंटरनेटवर उपलब्ध आहे. या माहितीखेरीज मला अन्य काहीही मिळाले नाही.