मॉस्को (रशिया) – युक्रेनच्या ड्रोननी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या ‘क्रेमलिन’ येथील निवासस्थानावर आक्रमण केल्याचा आरोप रशियाने केला आहे, अशी माहिती ‘रॉयटर्स’ वृत्तसंस्थेने दिली आहे.

उभय देशांमध्ये १४ महिन्यांपासून पासून चालू असलेल्या युद्धामध्ये आतापर्यंतचा रशियाचा युक्रेनच्या विरोधातील हा सर्वांत मोठा आरोप आहे.

युक्रेनने मात्र रशियाचा हा दावा फेटाळून लावला असून ‘रशिया या माध्यमातून ‘मोठा आतंकवादी सूड’ उगवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे, असा प्रत्यारोप केला आहे.