अनलॉक-५ च्या गाइडलाइन्स ३० नोव्हेंबरपर्यंत, कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाउन कायम.

68

नवी दिल्ली: Unlock-5 ची मार्गदर्शक नियमावली (गाइडलाइन्स) ३० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. मंगळवारी या संदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाने आदेश देखील जारी केले आहेत. ५० टक्के सीटसह सिनेमा, थिएटर आणि मल्टिप्लेक्स सुरू करण्याबरोबरच अशाच प्रकारच्या इतरही बाबींना परवानगी देणारी अनलॉक-५ च्या मार्गदर्शक सूचना आता आणखी एक महिनाभर लागू राहणार आहेत. मात्र, कंटेनमेंट झोनमध्ये पूर्वीप्रमाणेच नियम राहणार आहेत. 

भारतात कोरोना संसर्गाबाबत अनेक गुडन्यूज ऐकायला मिळत आहेत. गेल्या २४ तासांमध्ये करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांची तुलना केल्यास कमी झाली आहे, ही दिलासादायक बाब आहे. तसेच, आनंदाची गोष्ट म्हणजे, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या घटली आहे. मात्र, असे असले तरी देखील केंद्रातील मोदी सरकार करोनाच्या संसर्गाची स्थिती पाहता कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा होणार नाही याची काळजी घेत आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने आपला अनलॉक-चा ३० सप्टेंबरचाच आदेश पुढे ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवला आहे. या नुसार राज्यांतर्गत किंवा राज्याबाहेर वस्तू तसेच लोकांच्या येण्याजाण्यावर कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध असणार नाही. यासाठी कोणत्याही प्रकारच्या विशेष अनुमती/अनुमोदनाची किंवा ई-परमिटची आवश्यकता असणार नाही.