soda-cold-drinks

कोल्‍हापूर – शीतपेयांमध्‍ये cold drinks ‘कॅफिन’ caffeine वापरलेले आढळून येते. ही पेये घेण्‍याचे प्रमाण १८ वर्षांखालील युवकांमध्‍येे अधिक आढळून आले. यामुळे युवकांच्‍या आरोग्‍यास धोका निर्माण होऊ शकतो. तरी नवे पारगाव येथील ग्रामपंचायतीने ग्रामसभेत चर्चा करून कोणत्‍याही दुकानदाराने गावात शीतपेयाची विक्री करू नये, तसेच त्‍याचे विज्ञापन त्‍यांच्‍या दुकानासमोर करू नये, असा ठराव केला आहे. अशी विक्री करतांना दुकानदार आढळल्‍यास त्‍यांच्‍यावर कायदेशीर कारवाई करण्‍याची चेतावणीही सरपंचांनी नोटिसीद्वारे दिली आहे.

‘अनेक चित्रपट अभिनेते, खेळाडू शीतपेयांचे विज्ञापन करतांना दिसतात; मात्र त्‍या पेयांतून काहीच लाभ होत नसल्‍याचे संशोधनांतून उघड झाले. यापेक्षा तरुणांनी ताक, उसाचा रस, लिंबू सरबत, मठ्ठा अशा स्‍वदेशी पेयांकडे वळावे. नवे पारगावप्रमाणे अन्‍य ग्रामपंचातींमध्‍येही असा निर्णय व्‍हावा’, अशी मागणी ग्रामस्‍थ आणि नागरिक करत आहेत.