News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

यवतमाळ – आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे लोक आहोत. त्यांनी नेहमी देशाची चेतना जागृत करण्यासाठी काम केले. आम्हीही त्यासाठी काम करत आहोत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते यवतमाळ येथे घेण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलत होते. या वेळी त्यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महाराष्ट्राचे संपूर्ण मंत्रीमंडळ उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळमध्ये विविध विकासकामांचे उद्घाटन केले. या वेळी बोलतांना मोदींनी ‘जय भवानी, जय शिवाजी, जय सेवालाल, जय बिरसा’ असे अभिवादन करून भाषणाला मराठीत प्रारंभ केला.

ते म्हणाले, ‘‘संपूर्ण विदर्भात मिळणारे प्रेम पहाता यंदा आम्ही ४०० आकडा पार करणार. देशाच्या प्रत्येक कोपर्‍याला विकसित बनवण्याचे माझे स्वप्न आहे. त्यासाठी चार प्राधान्याचे घटक आहेत. गरीब, युवा, शेतकरी, महिला हे सशक्त झाले, तर देश विकसित होईल.’’