तुमच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा वापर इतरांवर वैयक्तिक आक्रमणे करण्यासाठी केला जाऊ शकत नाही; पण दुर्दैवाने काही लोक समाजात आणखी फूट पाडण्यासाठी अभिव्यक्तीस्वातंत्र्याला जन्मसिद्ध हक्क मानत आहेत, अशा शब्दांत उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुणाल कामरा प्रकरणी विधान केले.
‘कुणालाही समाज तोडण्याची किंवा विशिष्ट व्यक्तीवर अशोभनीय टिपणी करण्याचा अधिकार नाही’, असे त्यांनी स्पष्ट केले. विनोदी कलाकार कुणाल कामरा याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर काही टिपण्या केल्या होत्या. त्यानंतर त्याच्यावर टीका झाली होती.