मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घटनास्थळी.
मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. या भीषण अपघाताने आपण व्यथित झाल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश ही दिले आहेत.
समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. समृद्धी महामार्गावरील सिंदखेडराजा येथील पिंपळखुटा गावात हा भीषण अपघात झाला. बस दुभाजकाला धडकली. त्यानंतर बसला आग लागली आणि 25 जणांचा मृत्यू झाला.
बसचा टायर फुटला. त्यामुळे बस खांबाला धडकली. त्यानंतर बसचे नियंत्रण सुटून समृद्धी महामार्गावरील दुभाजकाला धडकली. त्यामुळे बस उलटली. बस पलटी होताच बसने पेट घेतला. काही प्रवासी खिडकीच्या काचा फोडून बाहेर पडले. या अपघातात चालकासह 8 जण बचावले आहेत. मात्र गर्दीत 25 जणांचा मृत्यू झाला. ट्रॅव्हल्स कंपनीकडून प्रवाशांची यादी घेऊन मृत व्यक्तीची ओळख पटवली जात आहे. या अपघातातील मृतांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. कारण मृतांचे चेहरे जळाले आहेत.
वाहतूक पोलिसांनी क्रेन मागवली असून बस हटवण्याचे काम सुरू आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ओळखपत्र शिल्लक नसल्याने मृताची ओळख पटवणे कठीण झाले आहे.
बुलढाणा अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना केंद्राकडून 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर खमींना 50 हजार रूपयांची मदत देण्यात येणार आहे.