News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

मुंबई : सणासुदीचा हंगाम आणि अनलॉकमुळे बाहेर पडलेल्या ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी घोषीत केलेल्या ऑफर्स कंपन्यांसाठी लाभदायक ठरल्या आहेत. या सणासुदीत इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि मोबाइल फोनच्या विक्रीत ३० टक्के वाढ झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

टीव्ही, रेफ्रीजरेटर, एसी, वाॅशिंग मशीन यासारख्या इलेक्ट्राॅनिक्स उपकरणांची ग्राहकांनी जोरदार खरेदी केली आहे. यंदा दिवाळीत इलेक्ट्रिनिक्स उपकरणे आणि मोबाइल विक्रीत ३० टक्के वाढ झाली आहे. सॅमसंग, शाओमी, एलजी, बॉश, सिमेन्स, रियलमी आणि विवो या कंपन्यांच्या विक्रीत वाढ नोंदवण्यात आली आहे

करोनाच्या साथीमुळे मागील जवळपास आठ महिने देशात टाळेबंदी होती. करोना व्हायरस रोखण्यासाठी सुरुवातीचे अडीच महिने कठोर टाळेबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे बाजारपेठ ठप्प झाली होती. औद्योगिक उत्पादनात मोठी घसरण झाली होती. मात्र अनलॉकअंतर्गत टप्याटप्यात सरकारने बाजारपेठ खुली केली आहे. मागील दोन महिन्यात यात सुधारणा झाली असून मॉल देखील खुले झाले आहेत.

इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर कंपन्यांनी अनेक सवलती दिल्या होत्या. ज्यात शून्य डाऊन पेमेंट ईएमआय योजना, कॉम्बो ऑफर , क्रेडीट कार्डवर कॅशबॅक यासारख्या सवलतींनी ग्राहकांना भुरळ घातली. स्मार्टफोनच्या विक्रीने करोना संकटात देखील रेकॉर्ड केला आहे. दहा हजारांच्या आतील बजेट स्मार्टफोन्सला प्रचंड मागणी आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तरातील शहरांमधून स्मार्टफोनला मोठी मागणी असल्याचे दिसून आले आहे.

संदर्भ व अधिक माहिती – महाराष्ट्र टाईम्स