राज्याच्या गृह विभागाने १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करण्याविषयी कोव्हिडचे नियम शिथिल करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. याविषयी राज्यशासनाने गृह विभागाच्या प्रस्तावाला मान्यता देऊन नियमावली जाहीर केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणार्‍या ‘शिवज्योत दौडी’त २०० जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरता ५०० जणांना उपस्थित रहाता येईल.

१९ फेब्रुवारीला असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीसाठी शिवज्योत आणि जन्मोत्सव कार्यक्रम यांसाठी विशेष गोष्ट म्हणून अनुमती देण्याची मागणी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मागणी मान्य केली असून कोरोनाचे नियम पाळून शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन केले आहे.