राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ ते २५ मार्च दरम्यान मुंबईत होणार आहे. ११ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाईल, अशी माहिती विधीमंडळ कामकाज मंत्री अनिल परब यांनी दिली.

अर्थसंकल्पावर ५ दिवस चर्चा होईल. या अधिवेशनात एक प्रलंबित विधेयक आणि इतर काही विधेयकं सादर केली जातील, असं ते म्हणाले. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सर्वांना RTPCR चाचणी आणि कोरोना प्रतिबंधक लशीच्या दोन्ही मात्रा घेणे बंधनकारक आहे. 

हे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे.