मुंबई – कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याने केंद्रशासनाने आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक नियमावलीत निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. १४ फेब्रुवारीपासून हा निर्णय लागू होणार आहे. देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर राज्यात दळणवळण बंदी लागू करण्यात आली होती. परदेशातील विमान वाहतुकीवरही बंदी घालण्यात आली होती. आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्यानंतर निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय केंद्रशासनाने घेतला आहे. यामध्ये जोखमीच्या देशांतून येणार्यांना ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी करण्याची आवश्यकता असणार नाही. ७ दिवसांचा गृहविलगीकरणाचा नियम असणार नाही; मात्र १४ दिवस स्वतःचे निरीक्षण करावे लागणार आहे. मार्गदर्शक तत्त्वांनुसार भारतात प्रवास करणार्या प्रवाशांना प्रवास करण्यापूर्वी ‘स्वयं घोषणा’ अर्ज भरून द्यावा लागणार आहे.
ठळक बातम्या
नाशिक जिल्ह्यातील २१३ गावांना ८१ टँकरद्वारे पाणीपुरवठा
नाशिक – राज्यात यंदा अल्प पाऊस पडल्याने पिण्याच्या पाण्यासमवेत शेतीच्या पाण्याचा मोठा प्रश्नही येत्या काही मासांत भेडसावणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदा पावसाळ्यामध्ये...
आणखी वाचा
पूर्णावतार असलेल्या श्रीकृष्णाने श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला पृथ्वीतलावर जन्म घेतला हा...
पूर्णावतार असलेल्या श्रीकृष्णाने श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला पृथ्वीतलावर जन्म घेतला. ती वेळ मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असतांनाची हाेती. हा दिवस म्हणजे कृष्ण...